(गौरकिशोर घोष यांच्या ‘लोकटा’ या बंगाली कादंबरीच्या, शहाण्यांनी अनुवादित केलेल्या ‘इसम’या पुस्तकाचं परीक्षण पु. ल. देशपांड्यांनी लिहिलं होतं, त्यातला काही भाग. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये २२ जुलै १९८०ला प्रसिद्ध झालेलं हे परीक्षण ‘दाद’ ह्या ‘मौज’ प्रकाशनाच्या पुस्तकात आहे.)
‘इसम’ आणि ‘मयत’ ह्या दोन अवस्थांखेरीज तिसरी अवस्था वाट्याला न येणार्या महानगरातल्या असंख्य इसमांतल्या एका इसमाची ही कथा आहे. भीषण आहे. करूण आहे. पण कारुण्य हसवण्यासाठी डोळ्यांना पाझर फोडण्याचा चुकूनही कुठे प्रयत्न नाही. मानवतेच्या प्रेमाचा गहिवर वगैरे भानगडी नाहीत. प्रभावासाठी कुठलीही चतुराई नाही. आणि मूळ बंगालीतली कादंबरी अशोक शहाण्यांनी मराठीत इतकी तंतोतंत उतरवली आहे, की प्रथम मराठीतून वाचून नंतर बंगालीतली वाचणार्याला गौरबाबूंनी अशोकच्या कादंबरीचे बंगालीत भाषांतर केलेय असे वाटावे. केवळ मूळ भाषा-शरीराशी परिचय, एवढ्या भांडवलावर भाषांतर करता येत नसते. मूळ लेखकाच्या भाषावस्थेशी तादात्म्य पावल्याशिवाय ही किमया साधत नसते. अशोक शहाणे भाषांतराला ‘अनुप्रास’ म्हणतात, खरे तर हे सहस्पंदन आहे.

. . . गौरकिशोर घोषांची ही साहित्यकृती मराठीत आणून बंगालीतल्या एका निराळ्याच ताकदीच्या लेखकाशी गाठ घालून दिल्याबद्दल ह्या कादंबरीचा वाचक अशोक शहाणेंना धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. ‘अपवाद फक्त कथा-कादंबर्या केवळ टाइमपास म्हणून वाचणार्या वाचकांचा’ असे म्हणणार होतो. पण नाही अशा वाचकालाही आपल्या ‘इसम’पणाची जाणीव करून देणारी अशी ही मनाला डसणारी कादंबरी आहे.
No comments:
Post a Comment